}); umeshughade: इ.1ली माहिती भरताना एरर आले तर??

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

इ.1ली माहिती भरताना एरर आले तर??

 विशेष आभार :-

 शिवाजी नवाळे सर
                  राहुरी अ'नगर

 ==================================================
सरल मध्ये इ.1ली च्या नवीन मुलांची  माहिती कशी भरावी.
             
  सर्व प्रथम https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा.
▶  आपले शाळेचे username आणि password टाकून login करा.

▶  student portal मधील Excell ला टच करा. त्यातील Download Personal वर क्लिक करा.

▶  त्यानंतर इयत्ता निवडा. Download file वर क्लिक करा.

▶  सर्व प्रथम Read me ही word फाईल डाउनलोड होईल. थोडा वेळ वाट पहा. की मग mini excel file download होते.

▶  इथे मात्र download होताना दोन file डाउनलोड होतात एक word ची आणि दुसरी Excell ची

▶  आपल्या computer च्या Downloads या भागात आपली download केलेली file जमा झालेली आहे

▶  word च्या file मधल्या सूचना काळजी पूर्वक वाचून घ्या.यामध्ये सेटिंग्ज दिलेली आहे. मात्र आपल्याला जी माहिती भरायची आहे ती excell च्या sheet मध्ये भरायची आहे

▶  Word च्या file मध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे Excell sheet मधील setting बदला. ही सेटिंग्ज आपण डाउनलोड केलेली mini File ओपन करून करा. सेटिंग्ज झाली की ती फाईल बंद करा आणि मग परत ओपन करा.

▶  File open झाल्यावर आपल्याला तीन tab दिसतील Insert , Update आणि Delete. त्यातील INSERT या tab वर क्लिक करून आपल्याला 1ली च्या नवीन मुलांची माहिती भरायची आहे.

▶  आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये आपल्या समोर विचारली गेलेली संपूर्ण काळजीपूर्वक माहिती भरा. खालील SAVE या BUTTEN वर क्लिक करून SAVE करा.

▶  असा फॉर्म प्रत्येक मुलासाठी भरायचा आहे.सर्व मुलांची माहिती भरून झाली की close button वर क्लिक करा. पुन्हा insert, update, delete ची window येईल. त्यामध्ये खाली Save & quite ला क्लिक करा. आता तुमची भरलेली सर्व माहिती Save झाली आहे.

▶  आता ही फाईल पून्हा एकदा ओपन करा.पुन्हा insert, update, delete ची window येईल. तिच्या उजव्या कोपर्‍यात फुली दिसते. तिला क्लिक करा. आता ही window जाईल.मग पूर्ण मुलांची यादी असलेली शीट्स दिसते. सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्या.

▶  जर भरलेल्या माहिती मध्ये दुरूस्ती करायची असेल तर  update या butten वर क्लिक करून General Register नंबर टाकून त्यासमोरील Get Data वर क्लिक करा आणि जो काही बदल करायचा तो करून माहिती बरोबर असल्यास update वर क्लिक करा.त्या मुलाची माहिती दुरूस्त होईल.

▶  जर Update मधूनही एखाद्या मुलाची माहिती दुरूस्ती होत नसेल तर अशा मुलाची entry शेवटच्या तिसऱ्या tab मधून म्हणजेच delete tab मधून काढून टाका. व पुन्हा Insert tab मधून त्याची माहिती पुन्हा एकदा नव्याने भरा.

▶  सर्व माहिती भरल्यानंतर insert, update, delete ची छोटी window बंद करून आता ही file Save as करून CSV COMMA DELIMETED मध्ये convert करा.

▶  आपली ही csv केलेली file आता upload साठी तयार आहे.मात्र ती ओपन करून पाहू नका.


आता file upload कशी करावी?

▶  पुन्हा Student portal ला लॉगिन करून Excell या टॅब वर जाऊन Upload Personal या टॅब वर क्लिक करा.*

▶  त्यानंतर Browse वर क्लिक करा.

▶  ज्या ठिकाणी आपल्या computer मध्ये file ठेवलेली आहे तिथे जाऊन तिला सिलेक्ट करा आणि open या butten वर क्लिक करा.

▶  येथे मात्र upload च्या दोन steps आहेत. Step 1 पूर्ण झाली की आपण भरलेल्या मुलांची माहिती दिसते. इथे परत एकदा खात्री करून घ्या. योग्य वाटले तरच step 2 ला क्लिक करा. दोन्ही steps पूर्ण होतील.

▶  Data upload succesfully messege आले कि समजा आपले काम झाले
====================================================

इ. 1ली च्या नवीन मुलांची नोंदणी करणे

  फाईल Error आली तर काय करावे
                


▶  1ली च्या मुलांची फाईल अपलोड करताना Create new division for master tab असा Error येत असेल तर काय करावे?

 ▶   सर्वात आधी हे लक्षात घ्या की हा प्रॉब्लेम मागील वर्षी तुकड्यांना A, B, C अशी नावे दिल्यामुळे येत आहे. तर काही मित्रांच्या शाळांचे Medium मागील वर्षी चुकले असेल तर त्यांनाही हा प्रॉब्लेम येत आहे.
        पण तुकड्यांची नावे बदलण्याऐवजी बरेच मित्र Master tab मध्ये जाऊन नवीन 1 नंबर असलेली Division तयार करत आहेत.मित्रांनो असे करू नका. असे केले तर आपला प्रॉब्लेम solve होत तर नाही उलट आणखी एक Division वाढते आणि ही वाढलेली Division आपल्याला delete पण करता येत नाही.
          लक्षात घ्या की आपल्याला आपल्या शाळेतील तुकड्यांची मागील वर्षी दिलेली A, B, C अशी नावे बदलून फक्त तुकडी 1,तुकडी 2,तुकडी 3 अशी करायची आहेत.आणि Medium चुकले असेल तर ते बदलायचे आहे.*
         मग अशा वेळी काय करायचे? तर मी सांगतो तसे करा.
1) Student portal वरील master tab मधील division ला क्लिक करा.*
2) Standard मध्ये जाऊन 1ली निवडा. 1ली निवडल्यानंतर आपल्याला काही वेळातच सर्वात खाली आपल्या शाळेतील मागील वर्षी जेवढ्या तुकड्या असतील त्या सर्व दिसतात.
3) यातील पहिल्या A तुकडीला क्लिक करा. आता तुम्हाला वर त्या A तुकडीची सर्व माहिती दिसते. त्या माहितीच्या Division मधील A काढून टाका व 1 लिहा. सर्वात महत्वाची गोष्ट तुमचे मागील वर्षी Medium बदलले असेल त्या मध्ये आता बदल करा. त्यानंतर खालील General Register मध्ये तुमच्या शाळेला लागू असलेले Primary किंवा Upper Primary निवडा. Board निवडा. तुमच्या तुकडीची Strength चुकलेली असेल तर ती पण बदला.आणि सर्व झाले की खाली दिलेल्या Update button वर क्लिक करा.
      Successfully Update असे आले की खालील A तुकडीची माहिती बदलून 1 झालेली दिसेल.
      अशीच प्रोसेस शाळेला जर जास्त तुकड्या असतील तर प्रत्येक तुकडीसाठी करायची आहे. मात्र दुसऱ्या B तुकडीला 2 आणि तिसर्‍या C तुकडीला 3 असे अंक वापरा.
     मित्रांनो एवढे सगळे केल्यानंतरही तुम्हाला जर अगोदर भरलेली फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तर तुम्हाला आता नव्याने पुन्हा एकदा फाईल डाउनलोड करून माहिती भरावी लागेल. कारण आपण Division चे नाव बदलले आहे. तसेच Medium बदलले आहे. आणि हे अपडेट झाल्यानंतरची फाईल डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे. मग मात्र 100 % तुम्हाला Error येणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगत आहे.

आणखी कोणती काळजी घ्यावी.

▶  आधार नंबर नसेल तर NO व्यवस्थित सिलेक्ट करा.

▶  जनरल रजिस्टर नंबर काळजीपूर्वक भरला आहे याची खात्री करून घ्या.

▶  initial Standard मध्ये 1 ली निवडली का ते खात्री करून घ्या.

▶  मागील वर्षी अनावधानाने अनेकांचे Medium चुकले होते. ते बरोबर आहे की नाही त्याची खात्री करा.

▶  जास्त Division असलेल्या शाळांनी 1,2,किंवा 3 अशी Division नंबर सिलेक्ट केले आहेत का याची खात्री करून घ्या.

▶  सर्व माहिती पुन्हा पुन्हा तपासून मगच फाईल csv comma delimited मध्ये Convert करा.

▶  मित्रांनो शेवटचे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही फाईल अपलोड केल्यानंतर step 1 पूर्ण झाली की आपण भरलेली सर्व मुलांची माहिती दिसते. ती बरोबर असल्याची खात्री करून मगच step 2 ला क्लिक करा.

▶   अत्यंत महत्वाची गोष्ट एकदा फाईल Successfully upload झाली की नंतर मात्र कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येत नाही. म्हणून मित्रांनो जो काही बदल करायचा असेल तो फाईल अपलोड करण्यापूर्वी करा. आणि मगच फाईल अपलोड करुन टाका.
 ================================================

इ.1ली च्या नवीन मुलांची भरलेली माहिती कोठे पाहावी?       
    मित्रांनो आपण इ 1ली च्या मुलांची फाईल अपलोड केल्यानंतर step 1 व step 2 ची प्रोसेस पूर्ण होते. कधी कधी step 2 लवकर पूर्ण न होता बरेच वेळ गोल चक्र फिरते. आणि प्रोसेस complete होत नाही.
        अशा वेळी logout करा. आणि ती फाईल पुन्हा Login करून अपलोड करा. अपलोड करताना जर This register no. all ready exist असा error दिसला की आपण समजायचे की आपण अगोदर अपलोड केलेली फाईल Successfully झाली आहे.
आता ही भरलेली माहिती कोठे पाहावी?

मित्रांनो आपल्याला 1ली च्या नवीन मुलांची भरलेली माहिती - Report tab मधील   HM LEVEL मधून खालील tab ला क्लिक करून पाहता येईल.ही माहिती बघण्यासाठी 4 मार्ग (options) उपलब्ध आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
 
 ▶  1) 1 ला option
Personal Details Checklist - Excel
  Excel file पाहण्यासाठी प्रोसेस -
   Personal Details Checklist -                   Excel ला क्लिक करा.
    i) शैक्षणिक वर्ष 2016-2017 निवडा.
    ii) Standard 1ली व तुमची Division निवडा.
   iii) Go ला क्लिक करा.थोडा process झाली की लगेच Excel file ओपन होईल.यामधून आपण भरलेली 1ली ची मुले दिसतात ते खात्री करून घ्या.

 ▶ 2) 2 रा option
     Standardwise No. Of Students
  यामध्ये 1ली ची मुले पाहण्यासाठी प्रोसेस -
     i) शैक्षणिक वर्ष 2016-2017 निवडा.
    ii) Division wise ला क्लिक करा.
    iii) Go ला click करा.
    iv) आता तुम्हाला Entered 2016 मध्ये 1ली च्या आपण भरलेल्या मुलांची संख्या दिसते.त्या संख्येची खात्री करून घ्या.

 ▶  3) 3 रा option
       Students Catalogue
  यामध्ये 1ली ची मुले पाहण्यासाठी प्रोसेस -
    i) शैक्षणिक वर्ष 2016-2017 निवडा.
    ii) Standard 1ली व तुमची Division निवडा.
    iii) Go ला क्लिक करा.थोडा process झाली की लगेच तुम्हाला तुमच्या तुकडीतील 1ली च्या नवीन मुलांची भरलेली माहिती ओपन होईल.यामधून आपण भरलेली 1ली ची मुले बरोबर आहेत का याची खात्री करून घ्या.
       मित्रांनो वरील तीनही options मध्ये आपण भरलेली 1ली च्या नवीन मुलांची माहिती लगेचच दिसते. पण खालील 4 थ्या options मधील pdf ची माहिती मात्र 2/3 दिवसानंतर पाहायला मिळते.

▶  4) 4 था option
 Personal Details Checklist - pdf
      मित्रांनो आपण भरलेली 1 ली च्या मुलांची माहिती pdf मध्ये येण्यासाठी 2/3 दिवस वेळ लागतो. म्हणून pdf मध्ये माहिती लगेचच न पाहता नंतर पाहावी.
  pdf पाहण्यासाठी प्रोसेस -
   Personal Details Checklist -                   pdf ला क्लिक करा.
    i) शैक्षणिक वर्ष 2016-2017 निवडा.
    ii) Standard 1ली व तुमची Division निवडा.
    iii) Go ला क्लिक करा.थोडा वेळ लागेल की लगेच Download ला ओके करा. Pdf file download होईल.
 ===================================================

         साभार:-
              शिवाजी नवाळे सर
                  राहुरी अ'नगर


No comments:

Post a Comment