}); umeshughade: Online Gas

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

Online Gasनमस्कार
मित्रांनो..!
LIC प्रमाणे च आपण नियमित वापरल्या जाणाऱ्या gas विषयी देखील ऑनलाइन माहिती घेऊ शकतो.*त्या साठी देखील आपल्याला userid v password generate करावा लागेल.

या Online सेवेतून

★ आपलं पूर्ण प्रोफाइल पाहू शकतो,एडिट करू शकतो.

★आपण गॅस बुकिंग करू शकता.

★ Booking करून त्याचे अगोदरच online payment देखील करू शकतो

★ दुसऱ्या सिलिंडर ची नोंदणी/मागणी करता येईल.

★ सबसिडी स्टेट्स पाहता येईल

★ आपल्या गॅस कनेक्शन ला आधार नंबर व बँक अकाउंट लिंकिंग केले आहे का? हे पाहू शकतो.

★ गॅस कनेक्शन ट्रान्सफर साठी Request करता येईल.

★ आता पर्यंत खरेदी केलेल्या सिलिंडर ची संख्या, तारीख,सबसिडी रक्कम याची सर्व माहिती मिळेल.

इत्यादी इतर आणखी बरच काही आपल्या कनेक्शन संदर्भात माहिती घेऊ शकतो.

 USERID PASSWORD generate करण्यासाठी

आपल्या गॅस कनेक्शन संदर्भात पुढील बाबी माहिती असणे आवश्यक आहे.

★ ग्राहक क्रमांक

★ ग्राहक नाव

★ रजिस्टर्ड मोबाईल नंबर

★  गॅस वितारकाचे नाव

आणि इतर स्वतः चे कनेक्शन घेताना जमा केलेले डॉक्युमेंट्स( वरील सर्व माहिती गॅस पासबुक व कनेक्शन प्रिंट वर असते.)Web Address

★ जर तुम्ही Bharat Gas User असाल तर...


www.bharatgas.in किंवा ebharatgas.in हा वेब अड्रेस ब्राऊझर मधून सर्च करा व customer login वर क्लीक करून प्रथम Registration किंवा New User वर टच करून विचारली माहिती भरून  registration करा व userid व password जनरेट करून घ्या मग तो userid व पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि खालील लिंक क्लीक करून Bharat Gas App इंस्टाल करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.cgt.bharatgas

-----------------------------------------------------------------------------------★ जर तुम्ही HP Gas ग्राहक असाल तर..myhpgas.in वर सर्च करून वरील प्रमाणेच प्रथम registration करून UserId Password Generate करून लॉगिन करा.

आणि खालील लिंक वरून Hp Gas App डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.HPLPGGas
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

★ आणि तुम्ही Indane गॅस customer असाल तरmyindane.in वर सर्च करून वरील प्रमाणेच प्रथम registration करून UserId Password Generate करून लॉगिन करा.

आणि खालील लिंक क्लीक करून Indane App इंस्टाल करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.indanegas
टीप:-

Generate केलेला UserId व Password सुरक्षित जतन करून ठेवा.एक वेळा  userid व password जनरेट केल्यानंतर तोच पुन्हा next टाईम लॉगिन करताना वापरावा लागेल.अशा प्रकारे आपण "घरगुती गॅस कनेक्शन"संदर्भात "घरी" बसून माहिती घेऊ शकतो.आणि आपण स्मार्ट मोबाईल वापरतो म्हटल्यावर या स्मार्ट बाबी सुद्धा आपल्याला जमायलाच हव्यात. तरच आपण स्मार्ट युझर व्हाल ना..?


 धन्यवाद

No comments:

Post a Comment