}); umeshughade: Learn Video Making

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

Learn Video Making

चला,तंत्रज्ञान शिकूया.

व्हिडिओ निर्मिती
        

नमस्कार मित्रानो,
व्हिडिओ मुख्य दोन साधनाद्वारे तयार करता येईल.
1)संगणक
2)स्मार्ट फोन

1)संगणकद्वारे


आज संगणक द्वारे सोप्या पद्धतीने शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कशी तयार करता येईल याची माहिती घेऊयात.तस  तर व्हिडीओ निर्मितीसाठी  खूप software आहेत. 

Camtasia 8.6 Studio

 
सहज व सोप्या पद्धतीने व्हिडिओ निर्मिती साठी :-

1)Power Point Presention मधून स्लाइड्स (PPT) तयार करता याव्यात.

2)आपल्या pc/लॅपटॉप मध्ये Camtasia 8.4 Studio हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल हवे.

3)आवाज रेकॉर्डिंग साठी माईक/हेडफोन विथ माईक हवा.

वरील बाबी असतील तर खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ आकर्षक असा व्हिडिओ तयार करता येईल.


1) प्रथम Power Point मधून ज्या घटकावर आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे, त्या घटकाच्या आकर्षक slide तयार करा.

2) तयार केलेल्या slide मधील शब्द व इमेज यांना आकर्षक अनिमेशन द्या.
लक्षात असुद्या फक्त animation द्या, Transitions देऊ नका. आणि Slide Transitions मध्ये On Mouse Click वर चेक मार्क असुद्या.

3)आपण पूर्वीच आपल्या pc मध्ये Camtasia 8 install केले असल्यामुळे
Power Point मध्ये ADD-INS नावाचा एक नवीन टॅब ऍड झालेला आहे, त्यावर क्लिक करा.

4)आता डाव्या बाजूला असलेल्या record वर क्लीक करा, उजव्या कोपऱ्यात click to begin recording वर क्लीक करा.

5)Ppt प्ले होईल, स्क्रीन वर एक एक शब्द ,इमेज व पुढील स्लाईड येण्यासाठी माऊस क्लीक किंवा नेक्स्ट ऍरो कि प्रेस करा. या वेळी इमेज ,शब्द नुसार माईक द्वारे आपला आवाज रेकॉर्ड करा.

6)पूर्ण स्लाईड रेकॉर्ड करून झाल्यानंतर तयार झालेला व्हिडिओ सेव्ह करा.

7) आता Camtasia Studio for Powerpoint नावच पेज येईल त्यातील Edit Your Recording वर चेक मार्क करून ok करा.

8)तयार व्हिडिओ Camtasia स्टुडिओ ओपन होईल.

9)आता येथून व्हिडिओ एडिट करता येईल.
बॅकग्राऊंड संगीत, आवाज , स्पीड, स्टिकर ,नको असलेला कट करता इत्यादी बाबी करता येतील व प्ले करून पाहता येतील.

10) पाहिजे असा तयार झाल्या नंतर वरील Produce And Share वर क्लीक करून हव्या त्या फॉरमॅट मध्ये आपला नवीन व्हिडिओ export करा व सेव्ह करा.

अशा प्रकारे power point रेकॉर्ड करून सोप्या पद्दतीने व्हिडिओ तयार करू शकतो. तर मग लगेच आपला स्वतः चा सुंदर असा व्हिडिओ तयार करा व share करा आणि इतरांनाही व्हिडिओ तयार करण्यासाठी माहिती share करा.
लेखन:- श्री.उमेश उघडे 
धन्यवाद
----------------------------------------------------------------------------------
२)स्मार्ट फोनद्वारे:-


    मोबाईल द्वारे व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी play store वरती विविध App उपलब्ध आहेत.
त्यातील Viva Video App द्वारे व्हिडिओ निर्मिती कशी करायची ते पाहूयात .


Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत

1) ईमेज vdo .

2) शैक्षणिक vdo


आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या

Viva video ओपन करा.


Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit slide show


Slide show फोल्डर ओपन करा.


Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल.


Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील.


ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा.


Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .


सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे.


सर्व photo done करा.


Video बोर्ड येईल.


Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration edit हे चार फोल्डर दिसतील.


प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल .


एक थीम निवडा . क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो


खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा


या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा


Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा


मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल


मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा . निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .


तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा


आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा

4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा


4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे


Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा


Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु


Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते


दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो


Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का


आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू


सुरुवातील नाव देऊ


थीम जाई पर्यंत रील पुढे सारा


थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा


Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का


Add वर क्लिक करा आणि थांबा


Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .


Aa वर क्लिक करा


Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल


Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल


पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका


मराठीत असेल तर अति उत्तम


खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा


चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का


त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा


अक्षरे मोठी झाली का ?


आता अक्षरांना कलर देवूया


 खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा


त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का


Vdo च्या वरील बाजूस अशी खूण आह.आहे का


वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा


एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा


एक स्लाइड संपताच vdo च्या खाली हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल


नंतर vdo च्या वर हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल


अशा पद्धती ने दोन तीन वेळा कृती  करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल


अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा


Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .


तो vdo draft मधे सेव करा


Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल gallery मधे येईल .शेअर करु नका .


आता थांबु या vdo तयार झाला .

 विशेष आभार :- श्री मधुकर माळी, MEL समूह 
धन्यवाद
-----------------------------------------------------------------------------------5 comments: