}); umeshughade: Dnyanrachanawad

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

Dnyanrachanawad
ज्ञानरचनावाद - संपूर्ण माहिती


अ.क्र. विवरण लिंक
ज्ञानरचनावाद - व्याख्या / संकल्पना DOWNLOAD
ज्ञानरचनावाद  - संपूर्ण संकल्पना DOWNLOAD
ज्ञानरचनावाद  - उपक्रम पुस्तिका DOWNLOAD
ज्ञानरचनावाद  - शैक्षणिक चित्रे DOWNLOAD
ज्ञानरचनावाद - रिकामे तक्ते DOWNLOAD
ज्ञानरचनावाद - पिडीएफ (स्वनिर्मित) DOWNLOAD
ज्ञानरचनावाद - पिडीएफ  (स्वनिर्मित) DOWNLOAD


नमस्कार
शिक्षक मित्रांनो..!
आज  ज्ञानरचनावाद या वर खूप भर दिला जातोय त्या साठी आपण खाली फरशी वर विविध चार्ट ,चित्रे इ रंगरंगोटी करून ज्ञानरचनावाद सराव घेण्याचा प्रयत्न करतोय.
तेच काम एका A4 कागदावर प्रिंट काढून त्यास लॅमिनेशन करून त्यावर पायलट पेन ने किंवा इतर जेल पेन ने लिहून ओल्या कापडाने सहज पुसले जाईल, शिवाय खर्च कमी येणार आणि एकाच वेळी वर्गातील सर्व मुलांना विविध चार्टस देऊन सराव पण करवून घेता येईल.
त्यासाठी ज्ञानरचनावाद यावर आधारित इयत्ता 1ली ते 4थी साठी चे विविध चार्टस/ नमुने PDF फॉरमॅट मध्ये देत आहे.१)ज्ञानरचनावाद 23 पेजस PDF*
साईझ :- फक्त 241 kb

goo.gl/Ydwj0W


२)ज्ञानरचनावाद 4 पेजेस PDF*
साईझ:- फक्त 287 kb

 

प्रिंट काढा व लॅमिनेशन करा.

लॅमिनेशन घरच्या घरी स्वतः करा तेही लॅमिनेशन मशीन शिवाय.
कृती:-
1) A4 साईझ मध्ये प्रिंट/झेरॉक्स काढा.(दोन्ही बाजूस/पाठपोठ प्रिंट काढू शकता.)

2) लॅमिनेशन पेपर मध्ये व्यवस्थित घालून घ्या.

3) वर्तमान पत्रात ते लॅमिनेशन पेपर घाला व त्यावर ऍडजस्ट ने इस्त्री फिरवा. वर्तमान पत्र लॅमिनेशन पेपर च्या खालून व वरून असलं पाहिजे आणि इस्त्री प्रमाणात गरम करा.

4) दोन मिनटात लॅमिनेशन तयार.

5) पायलट पेन किंवा इतर जेल पेन ने लॅमिनेशन वर सहज लिहलं जात व ओल्या कापडाने पुसलं पण जात.
या पद्धतीने 1 झेरॉक्स 2 + एक लॅमिनेशन पेपर 5 + एक पेन 10= म्हणजे एकूण 20 रुपये पर्यंत खर्च येईल.

अशा प्रकारे कधीही,कुठेही सराव घेता येईल शिवाय खर्च हि मर्यादित.*

चला तर मग डाउनलोड करा व ज्ञानरचवाद - वापर/सराव घ्या.
अशा प्रकारे तुम्ही हि तुमच्या कल्पकतेने अधिक मटेरियल तयार करू शकता.मी नमुना दाखल दिले आहे.            धन्यवाद