}); umeshughade: Online SBI - Net Banking

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

Online SBI - Net Banking

SBI Net Banking

मित्रानो,

नमस्कार.!


काही महिन्याभरापूर्वीच आपले पायमेंट्स sbi बँक मध्ये होत आहेत.

Sbi ATM सुविधेचा  आपण पुरेपूर वापर करत आहोत.याच्या हि पुढील सुविधा म्हणजे Net Banking होय.

आज प्रत्येकाकडे  android  मोबाईल आहेत, याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे.या साठी sbi net banking ऍक्टिव्हेट करून मोबाईल द्वारे पूर सुविधा वापरता येतील.


नेट बँकिंग द्वारे घरी बसल्या बँकेत न जाता पुढील सुविधा वापरता येतील★ कधीही बँक बॅलन्स पाहता येईल.★ *आपल्या बँक खात्याचे वार्षिक,मासिक,मिनी स्टेटमेंट पाहता येईल/ pdf स्वरूपात डाउनलोड करता येईल/प्रिंट काढता येईल.*★ SBI चे लोन असेल तर त्या संबधी पूर्ण माहिती मिळेल.★ चेक बुक मागणी करता येईल.★ बँक खात्याच्या वारसांची नियुक्ती/बदल करता येईल.  सर्व मोबाईल रिचार्ज करता येतील.★ सर्व डिश रिचार्ज करता येतील.★ LIC च्या हप्त्याची रक्कम भरता येईल.★*वीज बिल भरता येईल.★ ऑनलाइन खरेदी करता येईल.★ स्वतः च्या खात्यावरून दुसऱ्या कोणत्याही बँक खात्यावर रक्कम ट्रान्स्फर (RTGS/NEFT) करता येईल.★ Personal किंवा Home लोन साठी नेट बँकिंग मधून Apply करता येईल.★ आपली वैयक्तिक माहिती बँकेत अपडेट ठेवता येईल.★ खात्या संबधी वा बँके संबधी तक्रार दाखल करता येईल.इत्यादी प्रकारचे व्यवहार Net Banking थ्रो करता येतील आणि Net Banking थ्रो झालेले व्यवहार पूर्ण गोपनीय व सुरक्षित असतील..!
कशी ऍक्टिव्हेट कराल  SBI Net Banking सुविधा..?1)प्रथम आपल्या sbi होम ब्रँच मध्ये जाऊन नेट बँकिंग ऍक्टिव्हेट करण्यासाठी application द्या.2) बँकेतून आपल्याला एक लिफाफा (Kit) मिळेल.त्यामध्ये नेट बँकिंग साठीचा Default User Id व Default Password असेल व डिफॉल्ट UserId व Password वापरण्या संबधी माहिती पत्रिका असेल.3) प्रथम आपल्याला मिळालेला Default User Id व पासवर्ड चेंज करावा लागेल आणि प्रोफाइल पासवर्ड पण create करावा लागेल.3) त्यासाठी आता आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर browser मधून Onlinesbi टाईप करून सर्च करा.

Sbi संबधी अनेक टॅब येतील.त्यातील login ला टच करा व बँकेतून मिळालेल्या Userid व Password इन्सर्ट करा व सबमिट म्हणा.4) नवीन लगीन टॅब येईल त्यात नवीन आपला स्वतः चा  user id  तयार करा.( हा _rameshpatil, ShivajiPatil, svpatil_  इत्यादी फॉरमॅट मध्ये तयार करा.)लक्षात ठेवा एक वेळ तयार केलेला userid पुन्हा बदलता येणार नाही.5) इथेच पासवर्ड चेंज करण्याची विंडो पण येईल.आपल्या सोईचा नवीन पासवर्ड तयार करून घ्या. पासवर्ड किमान 6 डिजिट्स असावा.त्यात अक्षर,नंबर व पण असायला हवेत.

उदा. styg@3578, hgtr@2897  इत्यादीयापुढे नेहमी sbi net banking लॉगिन करताना वरील तयार केलेला userid व password वापरावा लागेल.6)आता लगेच create प्रोफाइल पासवोर्ड ची विंडो येईल.

तो सुद्धा तयार करून घ्या.

हा सुद्धा किमान 6 डिजिट्स चा असेल व यातही नम्बर,अक्षर व असायला हवेत आणि याचे पहिले अक्षर capital च असायला हवे.

जसा

Mdfgrm@6587

इत्यादी.प्रोफाइल पासवर्ड खूप महत्वाचा असून नेट बँकिंग मधून कोणताही आर्थिक व्यवहार व सेटिंग चेंज करताना वापरावा लागतो.अशा प्रकारे Userid , Login Password व Profile Password असे महत्वपूर्ण तीन पासवर्ड तयार करून net banking ऍक्टिव्हेट करावे लागेल.


★ SBI Net Bnking कसे वापराल?


1) आत प्रथम ब्राउझर मध्ये किंवा sbi anywhere अँप मध्ये जाऊन वरील userid व password टाकून लगीन करा.2) browser मधून ओपन केल्यावर  My Accounts, Payments, Transfer, Bill Payments, Enquiries, Profile, E tax, E Services इत्यादी अनेक टॅब आहेत.प्रत्येक टॅब ला टच केल्यावर त्यात आणखीन sub tab आहेत.3) यातील प्रोफाइल हा मुख्य टॅब आहे.यातून आपल्या नेट बँकिंग संबधी पूर्ण सेटिंग चेंज करता येईल.

मुख्य म्हणजे मनी ट्रांसफर साठी आपल्या अकॉउंट ला ज्या बँक खाते ट्रांसफर करायचे आहे ते ऍड करावे लागेल.

यासाठी add binifeary वर टच करून त्या खात्याची पूर्ण माहिती फिल करा आणि सबमिट करा आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकांवर आलेली otp इन्सर्ट करून approve करा.पुढील 24 तासात add केलेली binifeary ऍक्टिव्हेट होईल. आपण मनी tansfar करू शकतो.

Bill / payment च पण अशीच कृती आहे.अशा प्रकारे विविध टॅब ओपन करून माहिती घ्या व नेट बँकिंग वापरा.★ महत्वाचे:-1)Net Banking सुविधा वापरण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक register करून घ्यावा लागेल.2) आपल्या खात्यावरून दुसऱ्या खात्यावर रक्कम ट्रान्स्फर करायची असेल किव bill भरायचे असेल तर तो खाते क्रमांक 24 तासापूवी आपल्या खात्याशी जोडा (प्रोफाइल मधून  add beneficiaries मधून ऍड करून approval करावा लागेल.

एक वेळ beneficiaries ऍड केल्यावर पुन्हा कधीही डायरेक्ट ट्रांसफर करता येतील.3) प्रत्येक आर्थिक व्यवहार करताना आपल्या मोबईल क्रमांकावर otp येईल अशी सेटिंग प्रोफाइल मधून करून घ्या.4) नेट बँकिंग मधून 2,00,000₹ चय पुढे ट्रान्स्फर करायची असेल तर RTGS करा अन्यथा NEFT करा.5) आपला userid व पासवर्ड इतरांशी share करू नका.★ NET Banking AppSBI Net Banking संबधी अनेक app आहेत .

यातील सर्वात उपयुक्त अस app म्हणजे *SBI Anywhere* हे आहे.

यात Mini Statement, Money Transfer(RTGS/NEFT) , dish richarge,mobile recharge, bill payment इत्यादी सुविधा वापरता येतात.

परंतु money transfer व bill payment साठी SBI Anywhere मध्ये beneficiaries व bill add करता येत नाही. यासाठी नेट ( browser) वरुनच  ऍड करावे लागते .Anywhere sbi डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक कराhttps://play.google.com/store/apps/details?id=com.sbi.SBIFreedomPlus
अशा प्रकारे वरील प्रकारे sbi net Banking सुविधा app मधून व मोबाईल ब्राऊझर मधून वापरता येईल.

उद्याच net banking सुविधा ऍक्टिव्हेट करून स्मार्ट नेट वापरकर्ते व्हा. आणि इतरांनाही सांगा.

3 comments:

 1. Fine,fast & furious world....life chage with security

  ReplyDelete
 2. SBI Online
  चालू करण्यासाठी आणखी एक सोपा मार्ग घरी बसल्या बसल्या चालू करता येते
  ती ��������
  Go to Onlinesbi.com
  ➡ personal login
  ➡register new user
  ➡Fill below info
  पासबुकवरील १ )Ac No .
  २ ) CIF No
  3 ) Branch code 5 अंकी
  ४ ) देश निवडा
  ५ ) नांदणी केलेला Mobile No.
  ६) Trasantion Rights Full
  ७) Chapta code

  SUBMIT

  U received OTP

  ⏺I don't have ATM Card
  ✅Yes I have ATM card

  Then fill Info given on ATM
  1) card holders' Name on ATM
  2) Validity
  3) CCV code
  4) ATM Pin

  Only One Rupee charge.

  Then receive UserId & Passward on your registered Mobile.
  Then you can login to SBI Online.

  ReplyDelete
  Replies
  1. सर आपण बँक आॕन लाईन आॕपरेटींग साठी खूप छान माहिती दिली.ख-या अर्थाने आपण पर्सनली माहितीचे संकलन करुन मेहनत घेतात खरोखरच कौतुकास्पद आहे.

   Delete